सुनील भंडारे पाटील
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे विषयी चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने, शिवसेना बाळासाहेबांची यांच्यावतीने अजित दादा पवार तसेच क्रूरकरम्या औरंगजेबा बद्दल सहानुभूती दाखवणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर राज्यात जनता नाराज असून, आज कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात आले,
लोकनेत्यांना जर इतिहास माहिती नसेल तर त्यांनी युगपुरुषावर, धर्मावर अजिबात बोलू नये, आणि जर बोलायचेच असेल तर पूर्ण अभ्यास करून बोलावे असे मत उपस्थितांनी व्यक्त केले, सद्यस्थितीत चाललेल्या नागपूर येथील विधानसभेतील हिवाळी अधिवेशनात बोलताना राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांचा तोल सुटला आणि त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक होते असे विधान केल्याने राज्यातील जनतेच्या, शंभू भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर नव्हता, हिंदू द्रेष्टा नव्हता, असे वक्तव्य करून या दोन्ही नेत्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, काही ठराविक समाजाचे मतदान मिळवण्यासाठी तसेच त्यांना खुश करण्यासाठी लोकनेते अशा स्वरूपाचे वक्तव्य करत आहेत, अशा स्वरूपाचे मत भगवानराव शेळके, कैलास सोनवणे, अनिल काशीद, जयेश दादा शिंदे, सोमनाथ भंडारे, सचिन भंडारे, यांनी तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त करून आपले मत व्यक्त केले, त्यामुळे राष्ट्रवादीचे हे दोन्ही दिग्गज नेते आता मात्र चांगलेच संकटात सापडले आहेत,
यावेळी पवार तसेच आव्हाड यांच्या विरोधात निषेधाची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्याचप्रमाणे त्यांनी वढू बुद्रुक आणि तुळापूर या ठिकाणच्या धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीवर येऊन लोटांगण घालून जाहीर आत्मकलेश करून जनतेची माफी मागावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल अशी मागणी यावेळी करण्यात आली, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, यावेळी भाजपचे, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,