सुनील भंडारे पाटील
ज्या लोकनेत्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक असे म्हटले आहे त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांनी 1988 साली 300 वा बलिदान दिन साजरा केला, शरद पवार साहेब यांनी कमिटी स्थापन केली, त्यामध्ये त्यावेळी, त्याअगोदर, आज देखील धर्मवीरच असा उल्लेख आहे,
300 वा बलिदान दिन साजरा करताना, वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान यांच्यावतीने बलिदान दिन साजरा करण्यात आला, या संस्थेवर पवार साहेबांचे निकटचे स्नेही आमदार बापूसाहेब थिटे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते, त्याचप्रमाणे नगरसेवक सुरेश राव नाशिककर, शाहीर योगेश, बाबुराव पाचरणे, पोपटराव गावडे, नरहरी गव्हाणे, निवृत्ती अण्णा गवारे, दत्तोबा ढमढेरे, डी डी भंडारे, अरविंद ढमढेरे, अशी अनेक जन शरद पवार साहेबांचे निकटवर्तीय काम पाहत होते, शिवाय या कालावधीतील दरवर्षी बलिदान दिनाच्या कार्यक्रमाला पवार साहेब स्वतः उपस्थित असायचे, या सर्व गोष्टी पंचक्रोशीतील तसेच राज्यातील जाणत्या व्यक्तींना माहिती आहेत, तेव्हापासून आत्तापर्यंत बलिदान दिनाचा कार्यक्रम असो, राज्याभिषेक सोहळा, त्याचप्रमाणे, जयंती कार्यक्रम यामध्ये फक्त आणि फक्त धर्मवीर नावाचाच उल्लेख आहे, असे असताना आता नेमके अजित दादा पवार, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना काय ही बुद्धी सुचली,
1988 साली प्रसिद्ध करण्यात आलेले पत्रक आणि एका वर्तमानपत्राने छापलेली ही बातमी नक्की पहा म्हणजे यांचे ज्येष्ठ नेते काय करतात आणि आता हे काय करत आहे, नक्की जनतेची शंका दूर झाल्याशिवाय राहणार नाही, या बातमीमध्ये प्रसिद्धी पत्रक व ती बातमी टाकली आहे, त्यामध्ये अनेक वेळा "धर्मवीर" शब्दाचा उल्लेख केला आहे नक्की आपण पहावे ,