खेड प्रतिनिधी लतिफ शेख
माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व आमदार दिलिप शेठ मोहिते शिवराजचे गुरु काका पवार यांच्या उपस्थितीत खेड तालुक्याचा वतीने महाराष्ट्र केसरी 2023 पै. शिवराज राक्षे यांच्या भव्य नागरी सत्कार करण्यात आला,
प्रथम राजगुरुनगर शहरातून मिरवणूक काढण्यात आली व बाजार समिती च्या आवारात प्रमुख सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेया कार्यक्रमास शिवराजचे कुंटुब व खेड मधील सर्व राष्ट्रवादीचे कार्येकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर बाबा राक्षे अशोक राक्षे नितीन राक्षे जि.प. अध्यक्षा निर्मताई राक्षे विनायक घुमटकर हिंद केसरी अमोल बुचुडे व अनेक कुस्ती क्षेत्रात पुरस्कार प्राप्त पैलवान व खेड परीसरातील तमाम नागरिक उपस्थित होते,
यावेळी राक्षेवाडी ग्रामस्थ व खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांच्या कडून प्रेत्येकी 5लाख व तालुक्यातील इतर ग्रामपंचायत व नागरिकांकडून 10लाख अशी एकूण 32लाखाची विजयी प्रोत्साहनपर रक्कम व भरीव मदत महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षेला मानाची चांदीची गदा खेड तालुक्यात आणल्या बद्दल तसेच भावी वाटचालीसाठी करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास मुसळे व आदेश टोपे यांनी केले तर आभार अशोक राक्षे यांनी केले