सुनील भंडारे पाटील
शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्या मधील, आणि हवेली तालुक्याच्या पूर्वपट्यामधील सर्वच गावांमध्ये आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
आपल्या भारत देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशातील अंतर्गत राज्ये, जिल्हे, शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक गावागावांमध्ये नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेती क्षेत्रातील विविध विकास कार्यकारी सोसायटी, अशा विविध ठिकाणी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले,
विविध ठिकाणच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच वाड्या वस्त्यांवरील अंगणवाडी शाळे मध्ये आदरपूर्वक ध्वजारोहण त्याचप्रमाणे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, गावातील प्रमुख व्यक्तींच्या वतीने खाऊ वाटप करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला, कोरेगाव भीमा, डिग्रज वाडी, धानोरे, सणसवाडी, पिंपळे जगताप, वाजेवाडी, वढू बुद्रुक, आपटी, पेरणे,डोंगरगाव, बुर्के गाव, पिंपरी संडास, न्हावी सांडस, वाडेबोलाई, केसनंद, वाघोली, लोणीकंद, वढु खुर्द, तुळापूर, भावडी व आसपासच्या अनेक गावांमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,