तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी
तळेगाव ढमढेरे (तालुका शिरूर) येथील ज्ञानेश्वर नगर येथील पप्पू भाकरे यांच्या विहिरीमध्ये एक कुत्रा पडल्याची माहिती दत्ता गायकवाड यांनी नेचर गार्ड ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष गणेश टिळेकर यांना दिली. अथक प्रयत्नाने नेचर गार्ड ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी ८० फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या कुत्र्याला विहिरी बाहेर काढून जीवदान दिले.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील पप्पू भाकरे यांच्या ८० फुट असलेल्या विहिरीमध्ये एक कुत्रा पडल्याचे तेथील स्थानिक नागरिक दत्ता गायकवाड व काही नागरिकांनी प्राथमिक प्रयत्न करूनही विहिरीत पडलेल्या कुत्र्याला बाहेर काढता आले नाही. त्यामुळे नेचर गार्ड ऑर्गनायझेशन संस्थापक अध्यक्ष गणेश टिळेकर यांना कळवण्यात आले. नेचर गार्ड ऑर्गनायझेशनच्या सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य वैभव निकाळजे, अक्षय निकाळजे, यांच्यासह गणेश टिळेकर यांनी तात्काळ धाव घेतली. ८० फूट खोल विहिरीच्या पडल्याने कपारीत जाऊन बसलेल्या कुत्र्यास दोरीच्या साह्याने उतरत नागरिकांच्या मदतीने सुखरूप पणे बाहेर काढले. याबाबत ग्रामस्थांनी नेचर गार्ड ऑर्गनायझेशनचे आभार मानले.
यावेळी सुरेश भाकरे, पप्पू भाकरे, साहिल बागवान हे उपस्थित होते