सुनील भंडारे पाटील
धर्मवीरपीठ, शक्तिपीठ, बलिदान पीठ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (तालुका शिरूर) व तुळापूर (तालुका हवेली) येथील अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ येथील पंचक्रोशी व राज्यातील लोकांची "धर्मवीर" शंभूराजे उपाधी ला शेकडो वर्षां पूर्वीचा इतिहास साक्षी आहे,
धर्मवीर शंभुराजे समाधीस्थळी आतापर्यंतच्या कालावधीमध्ये धर्मवीर उपाधीने संबोधले जाते, शिवाय वढु बुद्रुक ग्रामस्थ, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांचे वतीने दैनंदिन नित्य समाधी पूजन पहाटे केले जाते त्यामध्ये पंचक्रोशी, तालुका, राज्य व देशातील कानाकोपऱ्यातील लोकांना धर्मवीर शंभूराजे समाधी, स्वामिनिष्ठ, मित्रनिष्ठ कवी कलश समाधी पूजनाचा मान दिला जातो, अत्यंत श्रद्धेने करण्यात आलेल्या समाधीपूजनामध्ये शंभू भक्तांनी केलेल्या पानफुलांच्या डिझाईन मध्ये " धर्मवीर" उपाधी आपल्याला पाहायला मिळेल, तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी, राज्याभिषेक सोहळा, जयंती कार्यक्रमाला देखील अशीच सजावट असते,ही अनेक वर्षांची परंपरा, लोकांची भावना आपल्याला पाहायला मिळेल, त्यासाठी आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ही वेबसाईट पहावी, जुनी अनेक छायाचित्रे आपल्याला पहावयास मिळतील, राजकारण्यांनी विनाकारण लोकांच्या भावनांशी खेळू नये, या बातमीसोबत छायाचित्र जोडले आहे, वाचकांनी पाहून घ्यावे, मग आपणच विचार करावा काय सत्य आहे ते,