सुनील भंडारे पाटील
पेरणे (तालुका हवेली) येथे संयुक्त शिवजयंती सोहळा 2023 मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला, गावातील तरुण,युवक, आबाल, वृद्ध, महिला तसेच सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन गाव पातळीवर एक गाव एक शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला,
या संयुक्त शिवजयंती मुळे गावाची एकजूट करण्यामध्ये तरुणांचा सहभाग होता, त्यामुळे परिसरातून पेरणे गावचे कौतुक होत आहे, शिवजयंती सोहळा कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये सकाळी पहाटे 5:00 वाजता लाल महाल पुणे कडे ज्योत आणण्यासाठी प्रस्थान करण्यात आले, सकाळी 9:00 वाजता पेरणे गावात शिवज्योत आगमन झाले, त्यानंतर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली, सायंकाळी 6:00 वाजता गावामध्ये भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते, शिवभक्तांसाठी रात्री 8:30 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, याप्रसंगी प्रमुख आकर्षण म्हणून, साऊंड सिस्टिम, लाईट शो, फायर शो, त्याचप्रमाणे पेपर ब्लास्ट शो चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता, गावातील सर्व स्तरातील व्यक्तींनी एक गाव एक शिवजयंती यासाठी प्रोत्साहन दिल्याने, पेरणे गावचे परिसरात कौतुक होत आहे,