सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यातील वालचंद नगर पोलीस स्टेशन मधील पोलीस हवालदार १० हजारांची लाच घेताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी पकडले,
वालचंद नगर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे या पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अन्वये लोकसेवक मोहन मल्हारी ठोंबरे पोलीस हवालदार वालचंद नगर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण, याला 10 हजार रुपये लाच मागून प्रत्यक्ष स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी रंगेहात पकडले, याबाबत तक्रारदार यांच्यावर दाखल असलेल्या तक्रारीमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी व मदत करण्यासाठी ठोंबरे यानी 10 हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना प्राप्त झाली होती, सदर तक्रारीची पडताळणी केली असता पोलीस हवालदार ठोंबरे याने तक्रारदार यांचेकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी करून प्रत्यक्ष स्वीकारताना त्याला ताब्यात घेण्यात आले, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत,
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने केली,