सुनील भंडारे पाटील
वाघोली (तालुका हवेली) व परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली, यावेळी तरूणांसह बालचमुनमध्ये मध्ये देखील मोठा उत्साह पाहवयास मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय जिजाऊ जय शिवराय, या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता."देशाचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज ,राष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज ,संपूर्ण जगाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज असे शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत सर्वांनी महाराजांना मुजरा करून वंदन केले .तर बालकांनी वेगवेगळ्या प्रकारचे वेशभूषा परिधान केली होती. शिवजयंती उत्सवानिमित्त तरूणांपासून अबाल वृद्धासह, महिला, नागरिकांमध्ये एक वेगळाच उत्साह,उर्जा,आनंद पाहावयास मिळाला. तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून छत्रपती शिवरायांना वंदन करण्यात आले.