सुनील भंडारे पाटील
शिवजयंती निमित्ताने पुणे शहरामध्ये स्वराज्य रथ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मराठा साम्राज्यातील 96 कुळी मराठा मधील सुमारे 73 रथांचा समावेश होता, या सोहळ्यात सणसवाडी येथील सर लष्कर दरेकर यांच्या 69 वा स्वराज्य रथ सहभागी झाला होता,
छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्ताने पुणे शहरामध्ये साक्षात स्वराज्य अवतरले होते महिला, पुरुष, लहान,थोर, आबाल,वृद्ध, पारंपारिक वेश परिधान करून, भगवे फेटे, कपाळावर भगवा, या वेशभूषेत सर्वत्र वातावरण भगवे मय झाले होते, जय भवानी जय शिवराय जय घोषाने पूर्ण पुणे शहर दणाणून गेले, हा स्वराज्य रथ सोहळा पुण्यातील लाल महालापासून भव्य दिव्य मिरवणूक सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले,
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असणारे पुरंधर तालुक्यातील आंबळेगाव येथील मूळनिवासी असलेले सध्या निवासी असलेले सणसवाडी,दरेकरवाडी, करंदी, मांडवगण फराटा, वढू खुर्द, त्याचप्रमाणे बारामती मधील वडगाव, अहमदनगर श्रीगोंदा येथील दरेकर कुटुंबीय सर लष्कर दरेकरांच्या रथ सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते,
याप्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित आप्पा दरेकर, सचिन दरेकर, प्रशांत दरेकर, निलेश दरेकर, अश्विनी दरेकर, नामदेव दरेकर, सुहास दरेकर,रामदास दरेकर, प्रशांत दरेकर, निलेश दरेकर, सुनील दरेकर, माजी सरपंच तुकाराम दरेकर, मोहन दरेकर, काळूराम दरेकर, बाळासाहेब दरेकर, भाऊसाहेब दरेकर, मयूर दरेकर, निखिल दरेकर, विक्रम दरेकर, राजेंद्र दरेकर, दादासाहेब दरेकर व मोठ्या संख्येने दरेकर बांधव उपस्थित होते,