शिक्रापूर प्रा.एन.बी.मुल्ला,
छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपूर्ण भारतभर साजरी होत असतानाच लंडनच्या ब्रुनेल विद्यापीठात शिकत असलेल्या तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील ऋतुराज महेश ढमढेरे याने पुढाकार घेत या विद्यापीठाच्या आवारात निसर्ग पवार, आदित्य तिठे, अभिषेक घावटे या मित्रांच्या सहकार्याने सुमारे २०० भारतीय व अन्य देशातील विद्यार्थी विद्यापीठ परिसरात एकत्र करत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणादायी विचार व भारतीय संस्कृती संपूर्ण जगाला आदर्शवत आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहात जगभरात शिवजयंती साजरी केली जाते. लंडनच्या ब्रुनेल विद्यापीठ परिसरात शिवजयंती साजरी करताना ' जय भवानी, जय शिवाजी ', छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी जयघोषाने विद्यापीठ परिसर दुमदुमून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून व भगवा उंचावून सर्व विद्यार्थ्यांनी जयघोष केला व मानवंदना दिली. लंडनमध्ये शिवजयंती साजरी केल्याने ऋतुराज ढमढेरे व त्याच्या सहकाऱ्यांचे पुणे जिल्ह्यात कौतुक होत आहे.