आंबेगाव प्रमिला टेमगिरे
सध्या थोरांदळे गावातील मळ्या - तळ्यातून ग्रामस्थांमध्ये खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या समोर जीवन जगण्याचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकरी वर्ग शेतात काम करण्यासाठी जातात तर त्यांना बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे .त्यामुळे सगळे शेतकरी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत.
ते बिबट हल्ले सुरू असताना आता चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय.काल रात्रीच्या वेळी गावच्या हद्दीत पाईन मळा या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींनी एका पत्र्याच्या शेड मधे राहत असलेल्या ज्येष्ठ नागरिक जोडप्याच्या घरात घुसून त्यांना दमदाटी करून मारहाण करून त्यांचे सोन्याचे दागिने व काही रोकड रक्कम लंपास केली .त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे .सदर घटना थोरांदळे गावातील पाईन वस्ती वर घडली असून त्या व्यक्तीचे नाव सीताराम मिंडे आहे आणि त्याच्या पत्नी हे दोघेच घरात होते .आरडा ओरडा करायला पण संधी मिळाली नाही.कारण चोरट्यांनी सीताराम यांच्या छातीवर पाय दिला होता .सगळा प्रकार आर्ध तास सुरू होता .नंतर चोरटे पसार होताच सीताराम मींडे व त्यांच्या पत्नी यांनी कसेबसे आजुभूच्य लोकांना हाक मारून बोलावून घेतले व घडलेला प्रकार सांगितला.हे ऐकून तेथील ग्रामस्थांनी तत्काळ मंचर पोलीस स्टेशन मधे संपर्क साधला असता गावचे पोलीस पाटील व पोलीस घटनास्थळी जाऊन तेथील सर्व पाहणी करून पंचनामा करून घेतला .
सदर चोरीच्या ठिकाणी मा.देवदत्त निकम साहेब यांनी देखील भेट देऊन नागरिकांना जागृत राहण्याचे आवाहन केले. पोलिसांना सांगितले की सदर प्रकरातील व्यक्तीचा लवकरत लवकर शोध घेण्याचा आदेश दिला असून पुढील तपास पो. नि.होडगर करत आहेत.