रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
मुंबई येथे झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात शहिद झालेल्या अंबादास पवार यांच्या पत्नीला न्याय मिळवून देण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की , शहिद पत्नी श्रीमती कल्पना अंबादास पवार यांनी कारेगाव ता. शिरुर येथे गट नंबर २९८/१ या २ गुंठा क्षेत्रात २००० चौरस फुटाचे दोन मजली आर.सी.सी. बांधकाम करायचे ठरविले होते. या बाबत त्यांच्या परिचयाचे प्रकाश हांडे यांनी बांधकाम व्यावसायिक संतोष जगदाळे यांच्या शी भेट घालून सदर बांधकाम मटेरियल सहित ४४ ,४०,०००/- ला करुन देण्याचे ठरले. त्या बदल्यात ३, ००, ००० रुपये आगाऊ रक्कम घेण्यात आली होती. या नंतर शहिद पत्नी श्रीमती कल्पना अंबादास पवार यांनी संतोष जगदाळे यांना काम कधी सुरु करता या बाबत फोन केला असता लाँकडाऊन आहे. कामगार गावाला गेले आहेत. असे उत्तर दिले. नंतर परत संर्पक साधला असता या ठेकेदाराने काम करण्यासाठी व पैसे देण्यासाठी टाळाटाळ करु लागला होता.
संबंधित ठेकेदार संतोष जगदाळे याने मार्च २०२० पासुन काम तर केले नाहीच ऊलट अँडव्हान्स घेऊन ही उडवा उडवी ची उत्तरे व टाळाटाळ होत असल्यामुळे
शहिद पत्नी श्रीमती कल्पना अंबादास पवार यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीसांत अर्थिक फसवणुकीची फिर्याद दिली असता सदर प्रकरण घोडनदी न्यायालयात गेले न्यायालयाने आरोपीने फिर्यादीचे घेतलेले तीन लाख रुपये जप्त करण्याचे आदेश पोलीसांना दिले होते. त्या नुसार रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी सदर रक्कम जप्त केली. व पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे , महिला पोलीस अधिकारी शुभांगी कुटे , माणिक काळकुटे , ठाणे अमंलदार आर.डी. ढगे यांच्या उपस्थितीत ही रक्कम परत करण्यात आली. तर पोलीस कर्मचारी संदीप जगदाळे यांनी ही कामगिरी केली आहे.