मुंबईत मढ ( मालाड , मालवणी ) मध्ये ७५ हजार स्क्वेअर फूट फिल्म स्टुडिओवर बुलडोझर

Bharari News
0
मुंबई प्रतिनिधी अनिल केळकर
       उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, मुंबईचे पालकमंत्री पद आतंकवादी याकूब मेमनला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अस्लम शेख यांना देण्यात आलं. याच अस्लम शेख ने पदाचा गैरवापर करत मालाड मध्ये ग्रीन झोन मध्ये ७५ हजार स्केवर फुटावर दोन मोठे फिल्मी स्टुडिओ उभे केले.  
   अस्लम शेख यांनी हे स्टुडिओ उभा करताना पर्यावरण खात्याची परवानगी घेऊन चालू केला. ग्रीन झोनर बांधकाम करता येत नाही असा कायदा सांगतो. पण, आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना अस्लम शेख यांना अनधिकृत स्टुडिओ बांधण्याची परवानगी दिली होती. त्या बदल्यात वडिलांची खुर्ची टिकवली की खोके घेतले ते पेंग्विनच सांगू शकेल.
      २१ ऑगस्ट २०२२ रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून अस्लम शेख यांच्या बेकायदेशीर स्टुडिओची बांधकाम ची चौकशी करून त्यावर हातोडा मारावा. या संदर्भात चौकशी केली त्यानंतर हरित लवादाने  देखील स्टुडिओ बेकायदेशीर घोषित केल्यानंतर आज कोट्यवधी रुपयांची उधळण करून बांधलेले स्टुडिओवर राज्य सरकारने बुलडोझर चालवला. एवढी मोठी कारवाई झाली पण, माध्यमातून किंव्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली नाही. स्टुडिओ एवढा मोठा बांधला आहे की, १० ते १५ दिवस लागतील संपूर्ण नष्ट करायला. एवढी मोठी कारवाई होत आहे. पण, कुठेच काही आवाज निघाला नाही. 
आपल्याकडे म्हण आहे ना, 'देवा'च्या काठीला आवाज नसतो.. पण लागते अशी की अस्लम शेखला तोंड सुद्धा उघडता नाही आलं.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!