कोरेगाव भीमा ते वढु बुद्रुक (तालुका शिरूर) या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर असताना या रस्त्याला तडे गेल्याने व चिरा पडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले असून रस्त्याच्या कामाचा दर्जा घसरल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोरदार चालू आहे,
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ जोडल्या जाणाऱ्या या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी सुमारे साडेनऊ कोटी एवढा निधी टाकण्यात आला असून कोरेगाव भीमाच्या बाजूने रस्त्याचे काम कड या कंत्राट दराने केले आहे, तसेच वढु बुद्रुकच्या बाजूने शितोळे या कंत्राट दाराने काम केले आहे रस्त्याची बरीचशी कामे अजून प्रलंबित असून, गव्हाणे वस्ती ते झेड एफ कंपनी पर्यंतचे काम अजून बाकी आहे, काम अजूनही पूर्ण नसताना काही ठिकाणी या सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याला 20 - 20 फुटापर्यंत तडे गेले आहेत, त्यामुळे रस्त्याची ही अवस्था ग्रामस्थांच्या लक्षात आली असून ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे, कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्याला तडे गेल्यामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत संबंधित खाते व ठेकेदार यांचे पूर्णपणे हलगर्जीपणा झाल्याची ग्रामस्थांमध्ये नागरिकांमध्ये जोरदार चर्चा चालू आहे,