सुनील भंडारे पाटील
लोणीकंद(ता.हवेली) येथील श्री रामचंद्र शिक्षण संस्थेचे श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील आदर्शवत लेखापाल अनिल दत्तात्रय जमदाडे यांना राष्ट्रीय उच्च शिक्षण परिषद,सरकार द्वारे मान्यता प्राप्त केंद्रीय ख्रिचन विद्यापीठ यांच्या वतीने क्रीडा व सामाजिक कार्यकर्ता यामध्ये उत्कृष्ठ काम केल्याने डॉक्टरेट पीएचडी पदवी प्रदान करण्यात आल्याने लोणीकंद येथील श्री रामचंद्र महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
डॉक्टरेट पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल अनिल जमदाडे यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम श्री रामचंद्र महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.यामध्ये जमदाडे यांचा सत्कार श्री रामचंद्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती भूमकर,श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश देसाई यांचा हस्ते पार पडला.याप्रसंगी महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका डॉ.सुषमा तायडे,डॉ सुजाता राव,एमआयटी कॉलेजचे जनसंपर्क अधिकारी राम हरी कराड,विद्यासंस्कारचे संपादक हेमंत कुलकर्णी,दिपाली होदडे,पाचर्णे सर,आदी शिक्षक,कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी क्रीडा शिक्षक डॉ.सुषमा तायडे यांनी सांगितले की अनिल जमदाडे यांच्या कार्याबद्दल ही पदवी देऊन त्यांना गौरवण्यात आले.डॉक्टरेट पीएचडी ही पदवी व मानचिन्ह व मेडल ही त्यांच्या कार्याची ओळख आहे.यापूर्वी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली होदडे यांनी केले.
[मेहनत,उत्तम व गुणवंत,आदर्श कामाच्या,कार्याच्या जोरावर आमचे महाविद्यालयातील अनिल जमदाडे सर यांना डॉक्टरेट पीएचडी पदवी मिळाली आहे.त्यांनी श्री रामचंद्र कॉलेजचे नावही सर्वठीकानी पोहोचविले याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देत आहोत.
*-मारुती(बापू) भूमकर,संस्थापक/अध्यक्ष-श्री रामचंद्र शिक्षण संस्था तथा प्रसिद्ध आदर्श उद्योजक,पुणे]*
[मला जी डॉक्टरेट पदवी मिळाले त्याचे खरे मानकरी माझा मित्र परिवार आहे.तसेच श्री रामचंद्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुतीबापू भूमकर यांचे मोलाचे मार्गदर्शन माझ्या पाठीशी असल्याने मी खरे तर यशस्वी ठरत आहे.पदवी मिळाल्याबद्दल माझा श्री रामचंद्र महाविद्यालयाने सत्कार केल्याबद्दल कॉलेजचे मी आभार मानतो.
*-अनिल जमदाडे,डॉक्टरेट पीएचडी पदवी प्राप्त लेखापाल.]*