सुनील भंडारे पाटील
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील ग्रामपंचायतींचे निवडणुकांचे बिगुल वाजले असून राज्य निवडणूक आयोगाकडून संबंधितांना परिपत्रक देण्यात आले आहे,
निवडणुकीचे टप्पे व तारखा अशा राहतील तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक 18/ 4/ 2023 ( मंगळवार), अर्ज मागवण्याचा व सादर करण्याचा दिनांक 25/ 4 /2023 ( मंगळवार) ते 2/5 / 2023 ( मंगळवार ) वेळ सकाळी 11 ते दुपारी 3, अर्जाची छाननी 3/5 / 2023, अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 8 /5/ 2023 ( सोमवार), उमेदवार यादी. चिन्ह नमुन देण्याचा दिनांक 8/ 5/ 2023 ( सोमवार), मतदानाची तारीख 18/ 5 /2023 ( गुरुवार), मतमोजणी व निकाल 19 /5/ 2023 ( शुक्रवार), अशा पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुका कार्यक्रम लागला आहे,
ही निवडणूक संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायत मधील सदस्य अथवा सरपंच यापैकी ज्या जागा रिक्त आहेत, म्हणजे निधन,राजीनामा, अनहर्ता, किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या जागांच्या तसेच थेट सरपंचाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकींसाठी पारंपारिक पद्धतीने राबवण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, याचे परिपत्रक राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार के सूर्यकृष्णमूर्ती उपायुक्त राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहे, अनेक दिवसांपासून प्रलंबित राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा असलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याने, सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे,