सुनील भंडारे पाटील
संपूर्ण देशात तसेच जगभरात गाजत असलेला मुद्दा उत्तर प्रदेशात अखेर माफिया राज संपुष्टात आला, उत्तर प्रदेश मधील गॅंग स्टार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांची प्रयागराज मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, या घटनेने देशात खळबळ उडाली आहे,
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रयागराज मेडिकल कॉलेज जवळ ही घटना घडली असून दोघांवर सुमारे 24 पेक्षा जास्त गोळ्या झाडण्यात आल्या त्यामध्ये त्या दोघांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे, या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफ पत्रकारांशी बोलत असताना कोणीतरी अतीकच्या डोक्यात गोळी मारली आणि आश्रफलाही गोळी मारली त्यानंतर अधिक गोळ्या घडल्याने त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला,
या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील गोळी लागली असून, पोलिसांचे पथक अतीक आणि अश्रफ याला घेऊन जात असताना ही घटना घडली, दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी तब्बल 24 राउंड फायर केले आहे, प्रयागराज पोलीस दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना वाटेत ही घटना घडली, या गोळीबारानंतर यूपी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे,