लोणी काळभोर सचिन सुंबे
हवेली तालुक्यातील बहुजन समाजाचे युवा नेते उरुळी कांचनचे माजी उपसरपंच जितेंद्र बडेकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देणार असून पुढील धोरण कार्यकर्त्यांशी बोलून ठरविण्यात येईल असे बडेकर यांनी सांगितले.
जितेंद्र बड़ेकर यांनी सांगितले की हवेली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडनुकीसाठी पक्षाच्या निष्ठावंताना डावळले जात असुन सामान्य व निष्ठावंत कार्यकर्ताकडे पैसे नसल्याचे सांगुन त्यांची तिकीटे कापली जात आहे . जितेंद्र बडेकर यांनी या निवडणुकीत मला पण पैसे मागीतले होते .मी नाही दिले म्हणून माजी उमेदवारी कट केली. असा आरोप केला आहे. तुम्ही आमची तिकीटे कट करुन तुम्हाला जे करायचे ते केले . आता आम्ही काय करतो ते पहा .यदां ही निवडणूक आन्याया विरुद्ध असणार आहे . मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लवकरच सोडणार असुन पुढील ध्येय धोरण लवकरच कार्यकर्तांशी बोलुन ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.