विद्यार्थ्यांना लहानपणीच सुसंस्कार झाले तरच भावी पिढी चांगली घडेल - चंद्रकांत दादा मोरे

Bharari News
0
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
          तुम्हाला कुणी प्रॉपर्टी जमीन बँकबॅलन्स विचारणार नाही , मुले काय करतात हेच विचारलं जातं ? मुलं हिच तर खरी संपती आहे , म्हणून मुलांना विद्यार्थी दशेतच सुसंस्कार झाले तरच भावी पिढी चांगली घडेल, स्वामी समर्थांचे चिंतन केल्यास चिंता हटेल ,असे प्रतिपादन त्रंबकेश्वर गुरुपिठाचे प्रशासकीय प्रमुख चंद्रकांत दादा मोरे यांनी सणसवाडी येथे उपस्थीत भाविकांसमोर केले .    
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शिक्रापूर ग्राम अभियानांतर्गत श्री स्वामी समर्थ सणसवाडी सेवा केंद्र प्रथम वर्धापन दिनानिमित्त शुभम मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मोरे बोलत होते . पूनम महाजन यांचे स्वागत गितानंतर प.पू . चंद्रकांत दादा मोरे, आमदार अशोक पवार, जि.प. सदस्या कुसुमताई मांढरे, पं स . सभापती मोनिका हरगुडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव व मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करून उद्‌घाटन करणेत आले .          यावेळी कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे , दता  हरगुडे, संजय भुजबळ, सुजाता पवार, कुसुम मांढरे, पंडीत दरेकर , दोनअशोक दिगवे, गोरक्ष भुजबळ, गोरख दरेकर , आदिनाथ हरगुडे , सुरेश हरगुडे, राजुअण्णा दरेकर , नामदेव दरेकर , उपसरपंच दतात्रय हरगुडे , पत्रकार मिडगुले आदींचा प. पू मोरे दादा व आमदार पवार यांचे हस्ते सत्कार करणेत आला . गंगाधर पठाडे यांनी शिरूर तालुक्यात १९ सेवा केंद्रा द्वारे चाललेल्या  कार्याची माहीती दिली . मा. सतिष मोटे यांनी पुणे जिल्ह्यात १८० सेवाकेंद्रे असून त्यामध्ये आयुर्वेद विभाग , युवा प्रबोधन व शिशु संस्कार , स्वयंरोजगार विभागात ८०% समाजसेवा व २० % अध्यात्म असे विनामुल्य काम चालत असलेचे सांगीतले . आ . पवार यांनी अशोक ढेकळे ,अरुण हिरे सणसवाडी सेवा केंद्राचे कामाची प्रशंसा केली . यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत दरेकर यांनी सणसवाडी केंद्रास ५ लाखाची मदत दिली व माजी सरपंच सुरेश हरगुडे यांनी ३ गुंठे जागा दान केली . दोन तास चंद्रकांत दादा यांनी अमोल मार्गदर्शन केले . दुपारी सणसवाडीतून पालखी सोहळा ग्रामप्रदक्षीणा घालणेत आली . सभापती मोनिका हरगुडे यांनी आभार प्रदर्शन व जयश्री विसपुते यांनी सुत्रसंचलन केले . पसायदान व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!