सुनील भंडारे पाटील
धर्मपीठ, बलिदान पीठ, शक्तिपीठ, प्रेरणापीठ, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील महिलांच्या वतीने अकरा मारुती दर्शन मोहीम झाली, श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित ११ मारुती मंदिरामध्ये जाऊन महिलांनी दर्शन घेतले,
स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी कार्य करण्यासाठी आता महिला रणरागिणी सरसावल्या असून दरवर्षी वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळी अशा मोहिमांचे आयोजन करण्यात येते, असंख्य महिला यामध्ये आनंदाने सहभागी होतात, त्यामुळे महिलांचे इतिहासाविषयीचे ज्ञान वाढते, या मोहिमेमध्ये सुमारे 107 महिलांनी सहभाग घेतला होता, महिलांसाठी आरामदायी बस सेवा, नाश्ता, जेवण, पिण्याचे शुद्ध पाणी याची सोय करण्यात आली होती, तीन दिवस चाललेल्या या मोहिमेत सर्व ठिकाणची माहिती देण्यात आली,
कोल्हापूर आणि सातारा परिसरामध्ये असणाऱ्या श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित ११ मारुती चे दर्शन महिलांनी घेतले ती 11 ठिकाणे पुढील प्रमाणे, दास मारुती चाफळ, प्रताप मारुती चाफळ, प्रताप मारुती उंब्रज, सुंदर मारुती मसूर, वीर मारुती शहापूर, प्रताप मारुती बत्तीस शिराळा, खडीचा मारुती शिराळा, विशाल मारुती मन पाडाळे, वीर मारुती माजगाव, बहेचा मारुती, अशा एकूण ११ ठिकाणी महिलांनी दर्शनाचा लाभ घेतला डॉक्टर संदीप महिंद गुरुजी यांनी प्रत्येक ठिकाणी महिलांना मार्गदर्शन केले, तसेच ऐतिहासिक माहिती दिली, या मोहिमेत ऐतिहासिक पन्हाळगडाची पाहणी महिलांनी केली,शिव समर्थ भेट शिंगणवाडी येथे हिंदू योद्धे भिडे गुरुजी, मिलिंद भाऊ एकबोटे यांच्या सभेने कार्यक्रमाची सांगता झाली, यावेळी वढू बुद्रुक येथील महिलांचा मातृशक्ती सन्मान करण्यात आला, या मोहिमेचे नियोजन नयना आरगडे, उर्मिला भंडारे, अंजली देशमुख, कीर्ती भंडारे, मीना भंडारे, कौशल्य यशवंत या महिलांनी केले होते,