सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक (तालुका शिरूर) या तीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम मध्यंतरी अचानक थांबल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण, प्रवास करताना ग्रामस्थांना करावी लागत आहे कसरत, संबंधित रस्त्याचे अर्धवट काम तातडीने चालू करावे ग्रामस्थांची मागणी,
कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक या तीन किलोमीटर असणाऱ्या रस्त्याचे काम कोरेगाव भीमाच्या बाजूने तसेच वढू बुद्रुक गावच्या बाजूने इतर कामे वगळता झाले असून मध्यंतरी फडतरे वस्तीते झेड एफ कंपनी पर्यंतचे काम बाकी आहे, ठेकेदार, पीडब्ल्यूडी सांगतेय महावितरण विद्युत खांब काढत नाही, झेड एफ कंपनी भिंत काढत नाही, महावितरण कडून नेमके उत्तर मिळत नाही,
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढू बुद्रुक येथे गेल्या महिन्यामध्ये पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा झाला, या कार्यक्रमापर्यंत रस्ता पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांची होती, असे असताना एकंदरीत या ठिकाणची परिस्थिती पाहता पीडब्ल्यूडी, झेड एफ कंपनी, महावितरण, ठेकेदार एकमेकाकडे बोट दाखवून टोलवा टोलवी करत आहे, गेल्या काही महिन्यापासून या रस्त्याचे काम थांबल्याने ग्रामस्थांना मात्र रस्त्यातील खड्डे खड्डे - धूळ यापासून होणाऱ्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे,