२१ वर्षानंतर पुन्हा वाजली शाळेची घंटा

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
     तब्बल २१ वर्षानंतर २००२ च्या दहावीच्या बॅचची पुन्हा एकदा शाळा भरली. श्री धर्मवीर संभाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय वढु बुद्रुक, (ता.शिरूर) येथे २१ वर्षानंतर दहावीच्या २००२ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहामध्ये आणि भावपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाले.   
 कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री छत्रपती शंभूराजे यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करून सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी दर्शन घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय स्वर्गीय कदम सर यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांची आठवण म्हणून विद्यालयाच्या आवारामध्ये एक वड व एक कांचन अशी दोन  झाडे लावली.सर्व विद्यार्थ्यांकडून ते झाडे जोपासण्याचा संकल्प करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. श्री.काळुभाऊ म्हस्कुजी भंडारे व कै.श्री. कदम सर  यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाचे सुरुवात झाली.
विद्यालयाचे कर्मचारी पांडे विजय बबन यांनी घंटा वाजवली आणि २१ वर्षानंतर पुन्हा एकदा या २००२ ची शाळा भरली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या विद्यार्थ्यांनी त्यांना शिकवणाऱ्या सर्व गुरुजनांचा सन्मान केला. विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण सर त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना २००२ च्या दहावीच्या वर्गाला वर्गशिक्षक लाभलेले  सोनवणे सर,   कुरकुटे सर, सोमनाथ भंडारे सर.शंकर भंडारे सर व अशोक भंडारे सर आणि सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान केला. विद्यालयाची गरज ओळखून सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शाळेला इन्व्हर्टर भेट दिला.बऱ्याच वर्षानंतर सर्व विद्यार्थी एकत्र येऊन त्या वेळेच्या गप्पागोष्टींमध्ये रंगून गेली. या सर्व वर्गाला एकत्र आणण्यासाठी महाराष्ट्र पोलीस रवी आहेर,अनिल देशमुख, सुनिल शिवले,प्रदीप भंडारे,अतुल शिवले,नितीन ढगे,रामदास शेळके, सुगंधा शिवले, रोहिणी भंडारे, मीरा पांडे, सारिका गाडेकर यांनी विशेष मेहनत घेतली.आज झालेली गेट-टुगेदर दरवर्षी आयोजित करण्याचा संकल्प या सर्व विद्यार्थ्यांनी केला. शाळेला असणाऱ्या भौतिक सुविधा व गरजा पूर्ण करण्यासाठी कायम प्रयत्न करून त्या पूर्ण करण्याचा  मानस सर्व विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.संपूर्ण दिवसभर हे विद्यार्थी त्यांच्या शालेय आठवणीमध्ये रमून गेले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आरगडे सर यांनी केले तर सचिन भंडारे यांनी आभार मानले,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!