आळंदीत हजेरी मारुती मंदिरात जन्मोत्सवा निमित्त मोठा उत्साह - आमदार दिलीप मोहिते यांचे हस्ते मंडप जिर्णोधाराचा शुभारंभ

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
         आळंदी येथे हनुमान जयंतीचा उत्साह मोठा दिसला, पारंपारिक ग्रामदैवत श्री हजेरी मारुती मंदिरात जन्मोत्सवा सोळा पार पडला त्यानिमित्ताने हजेरी मारुती सभामंडपात पहाटे पाच ते सात या वेळेत ह भ प दत्तात्रय महाराज ठाकरे यांचे कीर्तन सेवा संपन्न झाली,               त्याचबरोबर वेदमूर्तींच्या मंत्रघोशांमध्ये पार पाडला तसेच आमदार दिलीप अण्णा मोहिते यांच्या हस्ते श्रीफळ फोडून हजेरी मारुती सभा मंडपाचा जीर्णोधाराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की आळंदीचे ग्रामदैवत हजेरी मारुती हे पुरातन धार्मिक स्थान आहे. हनुमान रक्षण करण्याचे कार्य करत असतात. संकट दूर करतात. आणि या मारुतीरायाची सेवा करण्याचे भाग्य मिळणे मोठी पुण्याईची गोष्ट आहे. यासाठी तुम्ही म्हणाल ती मदत द्यायची माझी तयारी आहे. अशी ग्वाही त्यांनी दिली. सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नारळ फोडून शुभारंभ केला आळंदीचे माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर यांच्या पुढाकाराने जीर्णोद्धारासाठी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले. यांच्या समवेत युवक कार्यकर्ते नितीन साळुंखे. सुनील रानवडे. वैजनाथ चौरे. लक्ष्मण शिंदे. सुधीर कुऱ्हाडे. एकनाथ वहिले .राजू सुतार. महेश पाचुंदे. रामभाऊ पाचुंदे. सचिन कुऱ्हाडे,युवराज घुंडरे,विशाल वहिले, ग्रामस्थांनी पहाटेपासूनच हनुमान जयंती निमित्त महाप्रसादाचे वाटप केले रात्री उशिरापर्यंत गावकरी भजनी मंडळाची सेवा हनुमान जयंती निमित्त चालू होती या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आळंदीचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे. माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले. माजी उपनगराध्यक्ष विलास घुंडरे. म्हणून माजी नगरसेवक डी डी भोसले.माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे.माजी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे. माजी नगरसेवक आदित्य घुंडरे. माजी नगरसेवक नंदकुमार कुऱ्हाडे. माजी नगरसेवक तुषार घुंडरे. माजी नगरसेवक सागर भोसले. यात्रा कमिटी अध्यक्ष शंकर कुऱ्हाडे. पत्रकार ज्ञानेश्वर कुऱ्हाडे.गुन्हे विभागाचे आळंदी पोलीस निरीक्षक रमेश पाटील.गोपनीय बारनिशी पोलीस मच्छिंद्र शेंडे.ॲड. संदीप गावडे. विठ्ठल घुंडरे. संतोष भोसले .आळंदीकर ग्रामस्थ. वारकरी .भाविक. भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंतीनिमित्त मोठी गर्दी हजेरी मारुती मंदिरात दिवसभर पाहायला मिळाली. महिला पोलीस. पुरुष पोलीस. नव शिवशक्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते मंदिरा जवळची गर्दी नियंत्रणासाठी कार्य करत असले चे दिसून आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!