सुनील भंडारे पाटील
अखंड हिंदुस्तानचे आरोग्य दैवत, स्वराज्याचे दुसरे धनी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यासाठी दरवर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2,99,0000 निधी मंजूर करण्यात आला असल्याचे भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे, वढू बुद्रुक (ता शिरूर) च्या सरपंच सारिका अंकुश शिवले यांनी सांगितले,
धर्मपीठ, शक्तिपीठ, प्रेरणापीठ, बलिदानपीठ धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळ वढु बुद्रुक येथे फाल्गुन अमावस्येला बलिदानदिन विविध उपक्रमांनी घेण्यात येतो, राज्याच्या तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त,शंभू भक्त येत असतात, त्याचप्रमाणे वर्षभर शंभू भक्तांची गर्दी असते, हा बलिदान दिनाचे स्वरूप मोठे होण्यासाठी भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांचे कायम प्रयत्न असतात, ग्रामपंचायत वढू बुद्रुक यांच्या सततच्या दोन वर्षाच्या प्रयत्नातून तसेच आमदार महेश दादा लांडगे यांच्या विशेष प्रयत्नातून दरवर्षीच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे 2,99,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला, त्याचप्रमाणे या वर्षाचा 2023 चेक देखील सुपूर्त करण्यात आला,
आमदार लांडगे यांच्या या निर्णयाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे, यावेळी माजी सरपंच अंकुश शिवले, उपसरपंच राहुल कुंभार, माजी उपसरपंच संतोष शिवले, ग्रामपंचायत सदस्य माऊली आप्पा भंडारे, कृष्णा आरगडे, ग्राम विकास अधिकारी शंकरराव भाकरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मणराव शिवले, अशोक फरताळे आदी उपस्थित होते,