रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
शेतकऱ्यांनी काळाजी गरज ओळखुन सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. सुरवातीला प्रायोगिक तत्वावर स्वतःला घरी खाण्यासाठी तरी सेंद्रिय शेतमाल पिकवला पाहिजे असे प्रतिपादन शिरुर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी पिंपरी दुमाला येथे केले,पिंपरी दुमाला गावात प्रथमच प्रिस्टाईन आयुर इंडिया चँरिटेबल फाऊंडेशन च्या माध्यमातून मोफत जर्मन टेक्नाॅलाॅजी मशीनच्या सहाय्याने संपुर्ण शरीराची तसेच इतर आजारांची पण तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिराच्या ऊद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
आरोग्या बाबत शेतकऱ्यांनी ही आता जागरुक राहण गरजेच आहे. कारण शेतकरी हा सर्व जगाचा पोशिंदा आहे. व हा पोशिंदा सुदृढ राहण ही काळाची गरज आहे. तसेच या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे व प्रिस्टाईन आयुर इंडिया चँरिटेबल फाऊंडेशन चे काम कौतुकास्पद असल्याचे ही पाचुंदकर यांनी सांगितले.
या प्रसंगी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार,पंचायत समिती सदस्य विक्रम पांचुदकर पाटील , ज्योती पाचुंदकर पाटील , प्रिस्टाईन आयुर इंडिया चँरिटेबल फाऊंडेशन चे डाँ. प्रविण बढे
पिंपरी दुमाला चे सरपंच महेंद्र डोळस,उपसरपंच जयश्री संदिप सोनवणे,माजी उपसरपंच माणिक म्हाळस्कर,ग्रा.प.सदस्य शरद खळदकर,राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष सुनिल सोनवणे,युवक कार्याध्यक्ष विजय खेडकर,तंटामुक्ती अध्यक्ष अमोल चिखले,उदयोजक डाॅ.श्रीकांत सोनवणे, भरत खेडकर,सोसायटी चेअरमन बबन चिखले,व्हा चेअरमन नंदाबाई डोळस, वाघाळे गावचे माजी सरपंच अमोल धरणे , पप्पु भोसले , दत्ताञय लांडे , मारुती नरवडे , गहिनीनाथ नरवडे , शरद नरवडे , अजय गलांडे ,हर्षद जाधव, ग्रामसेवक विशाल ढसाळ, तानाजी भोसलेअमोल पांचुदकर,उमेश पांचुदकर,
सोमनाथ बांदल धनंजय देवकर,बाळासाहेब लांडे,पंडित लांडे सप्ताह मंडळाचे अध्यक्ष अरुण कळसकर,मा उपसरपंच कैलास पिंगळे,दुध डेअरी चेअरमन माऊली सोनवणे,मा व्हा.चेअरमन विष्णु सोनवणे,रामचंद्र सोनवणे,राजेंद्र बडदे,मंगेश बडदे,मयुर बडदे,उदयोजक अभिषेक शेळके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येंने ऊपस्थित होते.
विशेषता यामध्ये गावातील तसेच परिसरातील महिला व जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी चे प्रिस्टाईन च्या तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून निवारण करण्यात आले याचे विशेष समाधान आम्हा सर्व ग्रामपंचायत पदाधीकारी व ग्रामस्थांना मिळाले याचा विशेष आनंद वाटतो.
****मा सौ.जयश्री संदिप सोनवणे
विदयमान उपसरपंच
ग्रामपंचायत पिंपरी दुमाला*******