साधना शाळेच्या जलतरण तलावामध्ये बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

Bharari News
0
लोणी काळभोर प्रतिनिधी
       हडपसर पुणे येथील (साधना) शाळेच्या जलतरण तलावामध्ये पोहायला गेलेल्या सोळा वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.     
  कृष्णा गणेश शिंदे (वय १६ रा. माळवाडी, हडपसर) असे तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा हा माळवाडी काळूबाई वसाहत येथे राहत असून साधना शाळेत नववीत शिकत होता. शाळेच्या प्रवेशद्वार शेजारी जलतरण तलाव आहे. कृष्णा हा मामासोबत तलावात पोहायला गेला होता. कृष्णा सकाळी नऊ वाजण्याच्या बॅचला जलतरण तलावामध्ये गेला होता. पोहून झाल्यानंतर मामा बाहेर आले. दरम्यान कृष्णा हा कपड्यासह पाण्यात बुडाला असल्याचे समजताच इतरांनी कृष्णाला बाहेर काढले. कृष्णाला जवळील दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.कृष्णाचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे समजू शकले नाही. मृतदेह उत्तरीय तपासणी नंतर मृत्यूचे कारण समजू शकेल. असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, जलतरण तलावात जीवरक्षक होते की नाही, याबाबत तपास केला जात आहे. कृष्णा हा गणेश शिंदे यांचा एकुलता एक मुलगा होता. मागील आठवड्या मध्ये लोणी काळभोर येथे अशीच घटना घडली होती..
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!