सुनील भंडारे पाटील
शिक्रापूर (तालुका शिरूर) येथील ग्रामपंचायत सदस्याने एका महिला तलाठ्यास जातीवाचक उच्चार करून सरकारी कामांमध्ये अडथळा आणल्याबद्दल ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे,
याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर येथील माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमेश राघोबा थोरात यांच्यावर ॲट्रॉसिटी तसेच सरकारी कामात अडथळा असे गुन्हे दाखल करण्यात आले असून, शिक्रापूर ग्रामपंचायत इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर तलाठी कार्यालयात कामकाज चालू असताना तारीख 12/5/2023 रोजी दुपारी 12:30 चे सुमारास थोरात यांनी दस्त 7/12 नोंदणी संदर्भात विचारणा करून जातिवाचक उच्चार केला, तसेच तलाठी कार्यालयातील रजिस्टर कागदपत्रांना इकडे तिकडे फेकून दिले, तसेच दरवाजाजवळ थांबून रागाने तलाठ्याकडे पाहिले व दमदाटी करून निघून गेले, याविषयी महिला तलाठ्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रमेश थोरात यांचे विरुद्ध ॲट्रॉसिटी, शासकीय कामात अडथळा या संदर्भात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पुणे ग्रामीण यशवंत गवारी करत आहेत,