लग्नांमधील लज्जास्पद प्रीवेडींग थांबवा - कायदेतज्ञ पोपटराव तांबे पाटील यांचे आवाहन

Bharari News
0
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
      आदर्श अशा भारतीय संस्कृती मधील १६ संस्कारांपैकी लग्न हा एक पवित्र असा संस्कार या प्रिवेडींगच्या फॅडने धुळीला मिळवला असून लग्नाचे दिवसी मोठ्या स्क्रीन पडद्यावर दाखवला जाणारा नवरा नवरीचा लग्नाआधीचा हा नंगानाच थांबवा, असे आवाहन खेड येथील कायदेतज्ञ एडवोकेट पोपटराव तांबे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले . 
   यावेळी अभ्यासू पत्रकार हरीदास कड यांनीही लग्नाआधी प्रिवेडींगच्या नावाखाली हे हप्ताभर परदेशात जाऊन लाखोची धुळधाण करत सभ्य गृहस्थांना न पहावतील अशा अश्चील पोजमध्ये फोटो काढून ते दिवसभर दिमाखात दाखवले जातात , पहा आम्ही आदर्श जोड काय काय पराक्रम करून आलोय . हे फोटो नजारे पाहून बायाबापड्या शरमेने मान खाली घालत चोरून पहातात ज्यांना हे चाळे पहायचीही लाज वाटते . पुर्वीच्या काळी लग्ना आधी तर सोडाच पण लग्ना नंतर ६ महिने नवरा नवरीची घरातल्यांसमोर बोलायची सुद्धा टाफ नव्हती म्हणून समाज व्यवस्था निकोप होती व पुढील पिढी सुदृढ निपजे .     
  आता ही खुट वांगी लग्नापुर्वीच असा उघड उघड उघडा व्यभिचार मार्ग खुला करून परिवाराची इज्जत अब्रु मातीला मिळवत आहेत , हे पालकांनाही कळू नये याचे दुःख वाटते . हाच व्यर्थ खर्च एखाद्या विधायक कामास वा अनाथ गरीब मुलांच्या शिक्षणास मदत केल्यास पुण्य व त्यांचा वैवाहीक जिवणा साठी दुवाही मिळेल व शुभविवाह शुभ व सफल होईल . बऱ्याचदा प्रिवेडींगला जाऊन आलेल्या उत्साही मुलांची लग्नेही तेथून परतल्यावर मोडलीही आहेत . आणि मिरवणुका व वरातीमध्ये नशेच्या आहारी जाणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या आयुष्याचे होणारे वाटोळे सारे पहातच आहेत, अशी वराती वा बैल गाड्याचे नादात बिघडलेल्या १५ %, मुलांची लग्नेच जमत नाहीत या समाज प्रदूषणाला जबाबदार कोण ? वरातीवाले, बैलगाडा मालक की निवडणुकीवेळी पैसा फेकत धाब्यावर पोरं बिघडवणारे पुढारी ? हा प्रश्नही तांबे व कड यांनी उपस्थीत केला . म्हणून हे प्रिवेडींग , निवडणुक पार्ट्यात नवपिढीला बिघडवणारे प्रकार थांबवावेत , कारण ते पोरगं घडवायला आईबापास २० वर्षे लागतात पण बिघडवायला वरातीचा व निवडणुकीचा धाबा पार्टीचा एक दिवस फार होतो . म्हणून पालकानो सावधान ! आपापली शिंगरं साभाळा , वराती , बैलगाडे वा पुढार्यांसोबत धाबा पार्ट्यांना पाठवू नका, असे आवाहन मोठ्या पोट तिडकीने तांबे यांनी दिले .यावेळी एडवोकेट संदिप नाईकरे, पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले , प्रा . राजेंद्र गुंड यांनी उपस्थीत केलेल्या शंकाना, प्रश्नांना तांबे व कड यांनी यथोचीत उतरे दिली,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!