सुनील भंडारे पाटील
पूर्व हवेलीत लोकसंख्येने मोठे असलेल्या पेरणे(ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गणेश ऊर्फ बापू हिरामण येवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली,
माजी उपसरपंच अशोक कदम यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी अध्यक्ष सरपंच उषा दशरथ वाळके,निवडणूक निर्णय अधिकारी पेरणेचे ग्रामविकास अधिकारी कानिफनाथ थोरात यांच्या अधिपत्याखाली ही निवडणूक पार पडली.यामध्ये उपसरपंच पदासाठी एकमेव गणेश उर्फ बापू हिरामण येवले यांचा अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच उषा दशरथ वाळके,ग्रामपंचायतीचे सदस्य अशोक कदम,अक्षय वाळके,सुजित वाळके,अलका वाळके,सारिका वाळके,अंकिता सरडे,शैला ढेरंगे नंदा ढवळे,अश्विनी ठोंबरे,माधुरी वाळके,कल्पना वाळके उपस्थित होते.उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेचे गणेश येवले यांची भंडारा उधळीत फटाक्यांच्या आतषबाजीेत पेरणे गाव ते पेरणे फाटा,येवले,सरडे वस्ती,कोळपेवाडी व तरवडी पर्यंत वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी त्यांचा सत्कार माजी उपसभापती माऊली वाळके,माजी उपसरपंच शरद माने,माजी चेअरमन दत्ता वाळके,सिध्देश्वर पतसंस्थेचे चेअरमन गोरख कापरे,माजी उपसरपंच शिवाजी वाळके,माजी सरपंच आत्माराम वाळके,दशरथ वाळके,माजी उपसरपंच राजेंद्र वाघमारे,चेअरमन मधुकर वाळके,माजी सदस्य साईनाथ वाळके,माजी सदस्य नारायण कोळपे,माजी सरपंच बाळासाहेब सरडे,आदी पदाधिकारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
पेरणे गावचा सर्वांगीण विकास करणार असून ग्रामस्थांच्या रस्ते,पाणी,वीज,आदी समस्या सोडवून विविध शासकीय योजना,सेवा,सुविधांचा लाभ ग्रामस्थांना मिळून देत पेरणे गाव आदर्श बनविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.
****गणेश ऊर्फ बापू येवले,नवनिर्वाचित उपसरपंच-ग्रामपंचायत पेरणे ****