आळंदी प्रतिनिधी आरिफभाई शेख
आळंदी देवाची तीर्थक्षेत्र असल्याने येथे मोठ्या प्रमाणात कीर्तन प्रवचनकार तयार होतात परंतु कीर्तनकार प्रवचनकार हे समाजप्रबोधनाचे काम करत असताना मानव मानवाचा द्वेष करतो हे संतांना कधीही मान्य नव्हतं त्यासाठी प्रशिक्षण दिले जावो ही संकल्पना उराशी बाळगून गाथा परिवाराने आळंदीमध्ये कीर्तन प्रवचन कार तयार करण्याचे शिबिर आनंद आश्रम येथे घेतले आहे,
या शिबिरात मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिला मुले तरुण-तरुणी यांनी या सहभाग नोंदवला सध्या देशांमध्ये सर्वत्र जातीवाद जातीदोष भावना दिसून येत आहे ही संकल्पना देशाच्या हिताची नाही त्यासाठी कीर्तनकार प्रवचनकार तयार व्हावेत त्यांनी समाजापर्यंत जाऊन जातीभेद अमंगळ आहेत जातीचा द्वेष करू नये सर्वधर्म समभावाची भावना जपावी जशी संतांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जपली छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्माचा आदर केला ज्ञानोबाराय तुकोबाराय सर्व वैष्णव धर्म प्रसारक नामदेवराय हे बंधुता समानतेचा निरोप घेऊन पंजाबच्या गुमान पर्यंत गेले हे समाजाला अभिप्रेत असावं यासाठी कीर्तनकार प्रवचनकाराने जातिभेद मांडले जातीभेद अमंगळ विष्णुमय जग ही संकल्पना राबवावी यासाठी गाथा परिवार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आळंदीमध्ये सुमारे तीन महिने सदरचा प्रशिक्षण शिबिर चालणार असल्याची माहिती उल्हास पाटील यांनी दिली आहे याबाबत बोलताना डॉक्टर चंद्रकांत पाटील म्हणाले की समाजामध्ये प्रवचनकार कीर्तनकार मोठी जबाबदारीची भूमिका पार पाडत असतात आपला समाज हा एकोप्याने राहणार आहे यामध्ये जातीय विष पेरून लोकांमध्ये देश भावना पसरून समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे विशिष्ट समाजाचे शत्रू आहेत हे बिंबवण्याचे षडयंत्र रचले जात आहे ते आणून पाडण्यासाठी कीर्तनकार प्रवचनकार तयार व्हावेत हा येतो राशी बाळगून आळंदी तीर्थक्षेत्री सदर प्रशिक्षण आम्ही घेत आहोत या कार्यक्रमासाठी आळंदीचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे. आळंदी भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे,सिताराम बाजारे. कीर्तनकार प्रवचनकार प्रशिक्षण घेण्यासाठी हजर होते त्याचबरोबर शिक्षक मोठ्या प्रमाणात या शिबिरात हजेरी लावल्याचे दिसून आले शिक्षकांना मे महिन्यात सुट्टी आहे आणि या सुट्टीचा उपयोग करून घेण्यासाठी कीर्तन प्रवचनांच्या पायऱ्या कीर्तन प्रवचनामध्ये कशी मांडणी असावी याचा प्रशिक्षण या शिबिरात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षक वर्ग उपस्थित राहिल्याचे दिसून आले आहे