सुनील भंडारे पाटील
शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार आणि सुजाता भाभी पवार यांची पत्रकारांसाठी तसेच जनतेसाठी मदत पाहता देवदूतच आहेत, त्यांच्या कार्यातून समाजाच्या अनेक स्तरांमध्ये प्रचिती येत आहे,
समाजामध्ये दोन वर्षांपूर्वी कोरोनाचे संकट असताना या दाम्पत्याणे शिरूर हवेली मतदारसंघात सुमारे 11 कोविड सेंटर उभारून स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता अनेकांना जीवदान दिले, गोरगरीब जनतेची सेवा केली, ही सेवा जनता अजून विसरली नाही, त्याचप्रमाणे मतदार संघामध्ये कार्यरत असणारे पत्रकार यांना देखील त्यांची मदत खूप असते, नुकत्याच घडलेल्या ज्येष्ठ पत्रकार के डी भाऊ गव्हाणे यांच्या अपघाती निधनापूर्वी अपघाता दरम्यान वाघोली येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये इन्शुरन्स क्लेम संपल्यानंतर मोठी अडचण तयार झाली होती, अशा परिस्थितीत काही पत्रकारांनी आमदार अशोक बापू पवार, सुजाता भाभी पवार यांच्याशी संपर्क साधला असता या दांपत्याने ऐन अधिवेशनामध्ये वेळ काढत फक्त एक दिवस थांबा...! हा शब्द खरा करीत के डी भाऊंना पुण्यामधील रुबी हॉल सारख्या उच्च हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या 10% कोठ्यामध्ये उपचार मिळवून दिले, त्यामध्ये धर्मदाय आयुक्तलयाकडून 38 लाख रुपये मदत मिळून दिली, पत्रकारांसाठी एवढे झटणारे आहे का कोन...! त्यामुळे आमदार अशोक बापू पवार, सुजाता भाभी पवार हे जनतेसाठी व पत्रकारांसाठी देवदूतच आहेत,