लोणी काळभोर प्रतिनिधी
लोणी काळभोर : (तालुका हवेली),इनामदार वस्ती येथे राहत असलेल्या आजी आजोबांना भेटण्यासाठी आलेल्या नातवाचा लोणी काळभोर येथील कॅनॉल मध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
झहीर समिर सय्यद वय वर्षे २२ हा मूळचा (मु.पो.बारामती,फलटण नाका, निलम पॅलेस) येथे राहत असून तो,लोणी काळभोर येथील इनामदार वस्ती,येथे राहत असणाऱ्या आजी आजोबांना भेटण्यासाठी आला होता.रविवारी रामदरा परिसराकडे जाणाऱ्या मुळा मुठा कालव्यात (कॅनॉल) मध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने कालव्यात उडी मारल्यावर तो पाण्याच्या वरच आला नाही.त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या वरती येऊ शकला नसावा . त्याची सर्वत्र शोधाशोध केली असता कोठेही दिसून आला नाही. दरम्यान त्याचा मृतदेह हा लोणी काळभोर हद्दीतच वाहून जाताना दिसून आला. यावेळी लोणी काळभोर पोलिस, लोणी काळभोर ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढला. झहीर हा, भारत फोर्स या नामांकित कंपनीत कामाला होता.सर्व व्यवस्थित असताना असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.लोणी काळभोर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत,