गुनाट प्रतिनिधी एकनाथ थोरात
पुणे जिल्ह्यामधील हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथील लोहार समाजाचा नव युवक राज्यसेवा परीक्षेत यश प्राप्त करत प्रथम क्रमांकाचे गुण मिळवत किरण देविदास पोपळघट या नवयुवकाने (DYSP) हे पद प्राप्त केले या प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक व सन्मान केला,
जिद्द , चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर काहींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात केली , तर काहींनी कुटुंबीयांचे स्वप्न साकारले . सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येते , हे परीक्षेतील यशस्वितांनी दाखवून दिले आहे . कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काहीही अशक्य नसते , असा संदेशच जणू त्यांनी आपल्या यशातून दिला आहे .वेळप्रसंगी छोटे - मोठे काम करून त्या जिद्दी तरूणाने पोलीस उपअधीक्षक होण्याचे स्वप्न साकारले या मिळालेल्या यशाबद्दल शिंदोडी गावातील ग्रामस्थांनकडून व पोपळघट परिवाराकडून यथोचित असा सन्मान करण्यात आला.
नवयुवक पोलीस उपअधीक्षक किरण पोपळघट तसेच उपव्यवस्थापक वेस्टर्न इंडिया फोर्जिंग लिमिटेड सणसवाडी रणजीत पोपळघट व नवनाथ पोपळघट या उपस्थित मान्यवरांचे शिंदोडी ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी शिंदोडी गावचे सरपंच अरुण दौलतराव खेडकर. इंद्रभान ज्ञानदेव ओव्हाळ, पोलीस पाटील भास्कर ओव्हाळ, पत्रकार एकनाथ थोरात,भगवंत वाळुंज, ग्रा.सदस्य गौतम गायकवाड, दौलतराव ओव्हाळ,सुदामराव धावडे,अनिल पोपळघट,शरद ओव्हाळ,उत्तम गायकवाड,खंडू दिवटे,देवराम दिवटे,संतोष चव्हाण,भरत दिवटे,सुनील पोपळघट, दत्तात्रय पोपळघट,रामदास थोरात व महिला वर्ग व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. व कार्यक्रमाप्रसंगी (DYSP) किरण पोपळघट यांना उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या मनोगतातून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्वात शेवटी पोलीस उपअधीक्षक किरण पोपळघट यांनी "शिक्षणाच्या आड मध्ये तुमची गरिबी आणि पैसा येत नाही तर तुमची जिद्द आणि ताकद लागते " असा मोलाचा संदेश दिला.