सुनील भंडारे पाटील
आपल्या परिसरातील नामांकित पूर्तता कंप्युटर एज्युकेशन MS-CIT केंद्र कोरेगाव भिमा (तालुका शिरूर) या केंद्राच्या विद्यार्थ्यांनी योग या विषयी चर्चा केली आणि त्यासंदर्भात माहिती घेतली. विद्यार्थ्यांना योगाच्या माध्यमातून विविध गोष्टींचे आकलन झाले. तसेच योगामुळे मानसिक ताण कमी होतो, किंवा व्यायाम आणि योग आपल्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण ठरतो या सर्व गोष्टींवर सखोल चर्चा करण्यात आली.
केंद्रातील विद्यार्थ्यांनी आयोजनात उपस्थित असलेल्या केंद्र समन्वयक आणि MKCLच्या समन्वयकांच्या नेतृत्वाखाली संगणकांवरील विविध योगांचे प्रदर्शन करण्यात आले. आपल्या पूर्तता कंप्युटर एज्युकेशन MS-CIT केंद्राचे समन्वयक नवनाथ सावंत सर/ सावंत मॅडम यांनी यामध्ये अत्यंत प्रभावशाली कार्यक्रमाचे आयोजन करून महत्त्वाची भूमिका बजावली.
या कार्यक्रमाची सुरुवात हि अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आली म्हणजेच MKCL च्या समन्वयकांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत खेळाच्या स्वरूपात काही गोष्टींचे आयोजन केले आणि कार्यक्रमाची सुरुवात करत असतांना या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात बिंबविण्याचे काम आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील उज्वल भवितव्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणते प्रयत्न करायला पाहिजेत, किंवा त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी कोणत्या गोष्टी त्यांना मदत करू शकतात अशा विविध प्रकारच्या चर्चेवर खूप मोलाचे मार्ग्दर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आले.
आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातील विविध योगांचे प्रदर्शन अत्यंत सुंदरपणे घडविले.योगाच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व तंत्रज्ञानेच्या परिस्थितीती व्यायाम आणि योगाच्या मदतीने कशाप्रकारे सुधारणा केली जाऊ शकते, तसेच निरोगी शरीर , तांत्रिक प्रशिक्षण, आणि स्वावलंबी आरोग्य या सर्व गोष्टीचे मार्गदर्शन MKCL च्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना केले. योगाचा अभ्यास हा आपल्या शरीराचे आणि आत्माचे संतुष्टीसाठी महत्त्वपूर्ण आहे. हे विद्यार्थ्यांना केंद्राच्या समन्वयकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. पूर्तता कंप्युटर एज्युकेशन MS-CIT केंद्राच्या विद्यार्थ्यांसोबत आंतरराष्ट्रीय योग दिन योगाच्या महत्त्वावर जागरूकता तसेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील उपयोगिता वाढवायला मदत करणारा महत्वपूर्ण कार्यक्रम ठरला.