सुनील भंडारे पाटील
पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या वाघोली गावच्या विकास कामांच्या बाबतीत माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांच्याशी संवाद साधून खासदार सुप्रिया सुळे यांनी वाघोलीच्या विकास कामांचा आढावा घेतला.यावेळी जयश्री सातव यांनी वाघोलीच्या विकासाबाबत येणाऱ्या अडिअडचणी व समस्या विषयी सुप्रिया सुळे यांना माहिती दिली.
पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या पूर्वीच्या ११ आणि नंतरच्या २३ गावांचा विकास व्हावा,यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून वारंवार बैठका आयोजित करण्यात येत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी वाघोली मधील विविध विकास कामांच्या बाबतीत आढावा घेत वाघोलीतील समस्या सोडवण्याचे आश्वासन माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांना दिले आहे.
याबाबतीत जयश्री सातव पाटील यांनी सांगितले की,रस्ते,वीज,पिण्याचे पाणी तसेच सांडपाण्याच्या बाबतीत जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा याबाबतची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली असून त्यांनी पुणे मनपा प्रशासना कडून याबाबतीत लवकरच बैठक आयोजित करून सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी सातव यांना दिले.