बकोरी येथील स्मशानभूमीची अत्यंत धोकादायक दूरवस्था;पत्राशेड कोसळले
पडलेल्या स्मशानभूमीतच होतो अंत्यविधी नूतन स्मशानभूमीचे विकासकाम कधी होणार? ग्रामस्थांमधील चर्चेला उधाण
बकोरी(ता.हवेली) येथील गावामध्ये असलेल्या स्मशानभूमीची अत्यंत दयनीय दुर्वस्था झाली आहे.यामध्ये स्मशनभूमीचे संपूर्ण पत्राशेड खाली कोसळले आहे.तर पत्राशेडला लागून असलेले सर्वच लोखंडी खांब वाकलेल्या अवस्थेत आहे.त्यामुळे ही स्मशानभूमी धोकायदायक स्थितीत आहे.
या स्मशानभूमीची धोकादायक स्थिती व दूरवस्था झाली असून सुद्धा याचं स्मशानभूमीत अंत्यविधी होत आहे.गावामध्ये इतर दुसरी स्मशानभूमी नसल्याने याचं स्मशानभूमीत नाईलाजाने ग्रामस्थांना अंत्यविधी करणे भाग पडत आहे.त्यामुळे नूतन स्मशानभूमीचे विकासकाम कधी होणार? याबाबत बकोरी ग्रामस्थांनमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच्या कालावधीत बकोरी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव मंजूर केला होता की,गट नं.७ मधील शेतकऱ्याच्या जागेत असणारी स्मशानभूमी गावठाणात हलवणे.तसेच २४ एप्रिल रोजी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वतीनेही पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव यांच्याकडून बकोरी ग्रामपंचायतीला समज देण्यात आला होता की,या स्मशानभूमीचे पत्राच्या शेड व पत्रे धोकादायक स्थितीत असल्याने याठिकाणी कोणताही अपघात होऊन धोक्याची स्थितीत दुर्दवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.याला सर्वस्वी जबाबदार बकोरी ग्रामपंचायत असेल तरी त्वरित बकोरी ग्रामपंचायतीने या धोकादायक स्मशानभूमी येथे कार्यवाही करून योग्य ते करावे.असे यापूर्वी समज लोणीकंद पोलीस स्टेशनकडून ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे.
याबाबत बकोरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आनंदा कांबळे यांच्याशी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन संपर्क साधला असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया माहिती देण्यास नकार देऊन टाळाटाळ केली.
[आम्ही स्मशानभूमी पडल्याबाबत पोलीस स्टेशनला पत्र दिले होते.ही स्म्शानभूमी खाजगी जागेत असल्याने आम्ही गावठाण जागेत नवीन स्मशानभूमी बांधणार आहोत.
*-शांताबाई सत्यवान गायकवाड,सरपंच- ग्रामपंचायत बकोरी.]*
[आम्ही ग्रामपंचायत मीटिंगमध्ये ठराव करून स्मशानभूमी बांधण्यासाठी जागा निश्चित करणार असून नवीन ठिकाणी लवकरच काम सुरु करण्यात येणार आहे.
*-द्रुपती संतोष वारघडे,उपसरपंच- ग्रामपंचायत बकोरी]*