शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
दिनांक 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन च्या निमिताने जनजागृती साठी विद्याधाम प्रशाला शिरूर मधील दहावी च्या विद्यार्थी यांना सहायक पोलीस निरीक्षक संदीप यादव,पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील ,पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले यांनी कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे व्यसनाचे आहारी न जाता उज्वल भविष्यासाठी उच्च ध्येय बाळगा व आयुष्यात यशस्वी व्हावा याबाबतचे मार्गदर्शन केले,
रविंद्र सानप ,पत्रकार प्रवीण गायकवाड (शिरूर नामा)यांनी ही विद्यार्थी यांना अमली पदार्थ पासून दूर रहा व आयुष्य चांगले जगा,कोणतेही व्यसन हे अरोग्याला घातक असते,त्यामुळे व्यसन भविष्यात करू नका याबत मार्गदर्शन केले तसेच तुमचे आई, वडील हे तुमच्यासाठीच काम करत असतात त्यामुळे त्यांना तुमच्याकडे पुरेसा वेळ द्यायला भेटत नाही तरी व्यसनापासून दूर रहा या बाबत मार्गदर्शन केले, सदर कार्यक्रमासाठी , प्रशालेचे ,कोकाटे सर,बनकर सर सामाजिक कार्यकर्ते प्रतीक बनकर,गोपनीय अंमलदार राजेंद्र गोपाळे हे उपस्थित होते.