पुणे नगर महामार्गावर कल्याणी फाटा चौक आणि वाडेगाव फाटा चौक या ठिकाणी दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून अनेकांना प्राणाला मुकावे लागले आहे, रात्रीच्या अंधारात गाडी न दिसल्याने मिळत आहे अपघाताला निमंत्रण, हे अपघात थांबवण्यासाठी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतिने संबंधित ठिकाणी हायमॅक्स दिवे लावावेत, अशा स्वरूपाची नागरिक भरत गव्हाणे यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,
संबंधित ठिकाणी गेल्या काही दिवसापासून अपघाताचे खूपच प्रमाण वाढले आहे, बरेचसे अपघात रात्रीच्या वेळी होत आहेत, हे अपघात थांबवण्यासाठी कोरेगाव भीमा मधील रहिवासी भरत गव्हाणे कळकळीची विनंती करत आहेत, " मी कोरेगाव भीमा मधील एक जागृत नागरिक म्हणून सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांना निवेदन करत आहे की, आपल्या कोरेगाव भीमा हद्दीमधील कल्याणी फाटा चौक, वाडेगाव फाटा चौक, तेथे मागील एक ते दोन महिन्यात विविध अपघातांमध्ये पाच लोकांचा मृत्यू झालेला आहे, माझी अशी विनंती आहे या दोन्ही चौकामध्ये चार फोकसचे हायम्यॅक्स दिवे बसवावेत जेणेकरून लोकांचा जीव वाचेल" अशा स्वरूपाची सामाजिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,