भाजप महाराष्ट्र क्रिडा आघाडीच्या प्रदेशध्यक्ष पदी पै.संदिप भोंडवे....
-[प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान]-
सुनील भंडारे पाटील
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश क्रिडा आघाडीच्या प्रदेशध्यक्ष पदी पै.संदिप भोंडवे यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पै.संदिप भोंडवे यांना प्रदान करण्यात आले.यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,भाजपचे प्रमुख पदाधिकारी विक्रांत पाटील,भाजपचे युवा नेते सचिन कोतवाल,युवा नेते दशरथ वाळके,आदी भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
सदयस्थितीत पै.संदीप भोंडवे हे भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष आहेत,तर कुस्तिगीर संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.पै.संदीप भोंडवे हे भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष झाल्यानंतर हवेली तालुक्यात झालेली पुणे पीएमआरडीए ची निवडणूक जिंकली,त्यानंतर पिडीसीसी बँकेची निवडणुकीत भाजपला हवेली तालुक्यातील भाजपचे प्रदिप कंद यांच्या रूपात संचालक पद मिळाले.त्यानंतर नुकतीच मागे पार पडलेल्या हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलचा एक हाती विजय झाला.या सर्व निवडणुकीत भाजपचे तालुकाध्यक्ष पै.संदीप भोंडवे यांनी मोलाची कामगिरी पार पाडली होती.तसेच गेल्या महिनाभरात भोंडवे यांनी भाजपचे पुणे जिल्ह्यातील एक मोठे डिजिटल जनसंपर्क कार्यालय बांधले.तसेच हवेलीत संघटना वाढीसाठी भोंडवेचे महत्वपूर्ण योगदान आजवर राहिले आहे.या सर्व घाटकांचा व त्यांच्या कामांचा आढावा घेऊन त्यांना हे भाजप महाराष्ट्र क्रिडा आघाडीच्या प्रदेशध्यक्ष पद प्रदान करण्यात आले असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
पै.संदीप भोंडवे हे कुस्तीगीर असुन राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत १४ वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे तसेच सेंट्रल रेल्वे कडुनसुध्दा काही काळ ते कुस्ती स्पर्धा खेळले आहेत.ते जाणता राजा कुस्ती केंद्र चालवीत असून त्यांच्या कुस्ती केंद्रातील अनेक पैलवानांना वरिष्ठ पातळीवर यश मिळालेले आहेत.तसेच या कुस्ती प्रशिक्षण केंद्रात ते
दत्तक कुस्तीगीर ही योजना राबवीत आहेत.या सर्व क्रीडा क्षेत्रातील कामांचा व कार्याचा आढावा घेऊन खरे तर त्यांना हे उच्च स्तरावरील भाजप महाराष्ट्र क्रिडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद मिळाले आहे.