आळंदी शासन आपल्या दारीला मोठा प्रतिसाद आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कल्याणकारी योजना तळागाळातील घरापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन
आळंदी प्रतिनिधी आरिफभाई शेख
आळंदी येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी या योजनेचा आज प्रारंभ झाला या कार्यक्रमाचे विशेष बाब म्हणजे यामध्ये महिलांचा वृद्ध यांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले.
वीवीध प्रकारच्या अडीअडचणी शासकीय दरबारात हेलपाटे मारावी लागल्यामुळे निकाली निघत नाहीत, त्यासाठी ही योजना आखण्यात आली असून लाखो लोकांनी लाभ घेतला असल्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. आळंदीतील या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सर्वप्रथम शालेय मुलांसाठी असणारे उत्पन्नाचे दाखले प्रमाणपत्र याबाबत प्रथम प्राधान्य देत काम करण्याची सूचना दिल्या तसेच पुढील काळामध्ये पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा हे अभियान राबवले जावे आणि लोकांची कामे तातडीने मार्गी लावली जावीत असे त्यांनी सांगितले. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की इतर लोकांप्रमाणे मी स्वतःच्या फायद्यासाठी येथे आलेलो नाही तर लोकांच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात त्यांची कामे मार्गी लागेल यासाठी इथे आलेलो आहे याची लोकांनी जाण ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मागे ठामपणे उभे राहावे तसेच लोकांना मोठ्या प्रमाणावर शासकीय जालनात हेलपाटे मारावे लागतात ते कमी होण्यासाठी शासन आपल्यादारीची योजनेचा लोकांनी लाभ घ्यावा याबाबतही त्यांनी मनोगत व्यक्त केले आळंदीचे माजी नगरसेवक प्रकाश कोरडे यांनी प्रास्ताविक केले तर डीडी भोसले पाटील यांनी आभार मानले या कार्यक्रमाला बबनराव कुऱ्हाडे. विलास घुंडरे. श्रीधर कुऱ्हाडे.अशोक कुऱ्हाडे. साहेबराव कुऱ्हाडे. ज्ञानेश्वर घुंडरे .संदेश तापकीर.ॲड सोहेल शेख.अनिकेत कुराडे निखिल बनसोडे.रोहन कुऱ्हाडे.निसार सय्यद. सचिन घुंडरे.पुष्पा कुऱ्हाडे. गौरी गोळे. रूपाली पानसरे.राणी रंधवे आदी उपस्थित होते,