सुनील भंडारे पाटील
पुणे शहरामधील येरवडा पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदारांवर लाच मागणी व लाच स्वीकारले प्रकरणी रंगे हात पकडून आज अँटी करप्शन ब्युरो च्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शितापीने कारवाई केली,
येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर 398/2023, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7,7अ,12 अन्वये लोकसेवक 1)जयराम नारायण सावळकर, पोलीस हवालदार,2) विनायक मुधोळकर, पोलीस हवालदार,3) राजेंद्र रामकृष्ण दीक्षित पोलीस हवालदार सर्व नेमणूक येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर या तिघांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे,
याबाबत तक्रारदार याचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय आहे, तक्रारदार च्या कारला झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी पो ह सावळकर यानी सुरुवातीस 20,000 रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना प्राप्त झाली होती, सदर तक्रारीची पडताळणी केली असता सावळकर यानी तक्रारदार यांच्याकडे 20,000 रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 13,000 रुपयांची मागणी केली, तसेच सहभागी पो ह मुधोळकर यांचे वतीने पो ह दीक्षित यानी 13,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले, या तिघांविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे त्यांना विशेष न्यायालय पुणे येथे हजर केले असता तीन दिवसाचे पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे चे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करत आहेत,
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शितल जानवे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने केली,