माहिती सेवा समितीचे माध्यमातून गेले अनेक वर्षापासून परीसरात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, जलसंधारण अशाप्रकारची कामे चालू आहेत संस्थेच्या माध्यमातुन बकोरी देवराई वनराई प्रकल्प बकोरी-केसनंद , धर्मनाथ देवराई वनीकरण प्रकल्प पिंपळे जगताप याठिकाणी वृक्षारोपण चालू आहे दोन्ही ठिकाणी प्रतेकी ५०००० चे आसपास वृक्षारोपण करण्यात आले आहे,
पिंपळे जगताप येथे शिरुर तालुका अध्यक्ष धर्मराज बोत्रे यांचे माध्यमातून वृक्षरोपण चालू आहे तसेच बकोरी येथे चंद्रकांत वारघडे यांचे माध्यमातून वृक्षरोपण चालू आहे यावर्षी माहिती सेवा समीती महावृक्षरोपण अभियान चालू करण्यात आले आहे त्यामध्ये दोन्ही देवराईत प्रतेकी १५००० झाडे लावण्यात येणार आहे त्याची सुरवात आज पि़पळे जगताप येथील देवराईत करण्यात आली माघील महीण्यात २००० व आज २००० झाडे लावण्यात आली .त्याठिकाणी आज अनेक कंपण्यांचे कामगार, ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांनी या महावृक्षरोपण अभियानात सामील होण्याचे आव्हान वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांनी केले .येणार्या काळात १ कोटी झाडे लावण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे वृक्षमित्र संदीप डफळ यांनी सांगितले. त्याचप्रमाणे यावर्षी संस्थेच्या माध्यमातुन १ लक्ष रोपे तयार करण्यात येणार आहे व त्यांचे वृक्षरोपण दोन्ही वनराईत करण्यात येणार असल्याचे राजु तांबे यांनी सांगितले. आईचे झाड या संकल्पनेतून आई श्रीमती कमल गोविंद वारघडे यांच्या ७६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने १ आगस्ट ते ३० आगस्ट पर्यंत बकोरी देवराई वनराई प्रकल्पात ५००० झाडे लावण्यात येणार आहे त्यामध्ये सहभागी होण्याचे आव्हान वृक्षमित्र धनराज वारघडे यांनी केले .दोन्ही वनराईत १०० देशी प्रजातींची झाडे लावण्यात आली आहे त्यामध्ये फळापासून ते औषधी वनस्पती सुद्धा लावण्यात आल्या आहेत अनेक सामाजिक संस्था, धानशुर व्यक्ती, वृक्षप्रेमी याकामात मदत करत आहेत.