सणसवाडी (ता शिरूर) येथील रामदास भाऊ दरेकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड माननीय राज साहेब ठाकरे यांनी जाहीर केली.रामदास दरेकर यांची मनसेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करून निवडीचे पत्र दिले आहे,
रामदास दरेकर पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये विविध पदावर काम करत आहेत .तसेच पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी सविता रामदास दरेकर यांची पंचायत समितीमध्ये निवड झाली होती . तसेच वहीनी सुनंदा नवनाथ दरेकर त्यांही सरपंच पदी निवडून आल्या होत्या .अशा पद्धतीने शिरूर हवेली तालुक्यात राजकीय सामाजिक कार्यात रामदास दरेकर नेहमीच अग्रेसर आहे व एक सरळमार्गी प्रामाणीक कार्यकर्ता म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मनसे जिल्हाध्यक्षपदी त्यांची आज निवड केली ,याप्रसंगी राजेंद्र वागस्कर , अजय शिंदे , बाळा शेडगे ,हेमंत बत्ते आदी उपस्थित होते . निवड झाल्यानंतर सर्व राजकीय सामाजिक थरातून रामदास दरेकर यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे .