सुनील भंडारे पाटील
बदलत्या वातावरणामुळे वढू बुद्रुक- केंदूर (तालुका शिरूर) आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या आठवड्याभरा पासून लोकांमध्ये डोळे येण्याची साथ आली असून केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गावांमध्ये या आरोग्य केंद्र मार्फत साथ आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत,
गेल्या आठवड्यापासून पुणे ग्रामीण भागाच्या केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्वच गावांमध्ये लोकांमध्ये डोळे येण्याच्या साथीने प्रवेश केल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते,परंतु नागरिकांनी तातडीने योग्य उपचार घेतल्याने तसेच केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सर्व गावांमधील प्राथमिक उपकेंद्र यावर तातडीने हालचाली करून उपचार केल्याने साथ आटोक्यात आली आहे, तरी देखील अजूनही प्रत्येक गावामध्ये दररोज तीन ते चार रुग्ण सापडत आहेत, योग्य उपचार घेऊन साथीवर मात करण्याचे आवाहन आरोग्य खात्याच्या वतीने करण्यात आले आहे,
डोळे येण्याच्या साथीचे रुग्ण सगळीकडे सापडत असून, आमचे शर्थीचे प्रयत्न युद्धपातळीवर चालू आहेत, अशा पेशंटची आम्ही काळजी घेत असून त्या संदर्भातील उपचार चालू आहेत, डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे चीपडणे, अशी या आजाराची लक्षणे असून, आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात यावर योग्य इलाज केले जात आहेत, अशी लक्षणे दिसल्यास लोकांनी तातडीने उपचार करण्याचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र केंदूरचे वैद्यकीय अधिकारी सारिका तायवडे यांनी केली आहे,