सुनील भंडारे पाटील
धर्मपीठ, शक्तिपीठ, प्रेरणापीठ, श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता शिरूर) येथील धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळावर आज सकाळी संभाजीराव भिडे गुरुजी यांनी दर्शन घेतले, यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी उपस्थित होते,
राज्याच्या पूर्वपट्ट्यामधील अमरावती,बुलढाणा तसेच इतर ठिकाणचे कार्यक्रम आटोपल्यानंतर सांगलीच्या दिशेने वाटचाल करत असताना, पुणे-अहिल्यानगर मार्गावरून प्रवास करताना कोरेगाव भीमा पासून अवघ्या तीन किलोमीटरवर असणाऱ्या तसेच हिंदू धर्माची दुसरी पंढरी समजल्या जाणाऱ्या, स्वराज्याचे धाकलं धनी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी भिडे गुरुजी यांनी थांबून आदरपूर्वक दर्शन घेतले, यावेळी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधीस पुष्पहार, पानफुल अर्पण, करून,भगवा आष्टगंध लावून पूजन केले, या धावत्या भेटी नंतर त्यांनी सांगलीकडे प्रस्थान केले, यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी उपस्थित होते,