सुनील भंडारे पाटील
शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या प्रयत्नातून चासकमान धरणा मधून उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आले असून हे पाणी पुढे पोटपाटाद्वारे सणसवाडी (तालुका शिरूर) येथील पाझर तलावामध्ये सोडण्यात आले, त्यामुळे सणसवाडी मधील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे,
याबाबत आमदार पवार यांचे खंदे समर्थक पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडितआप्पा दरेकर यांनी दिलेल्या माहिती नुसार गावामध्ये महत्त्वाचे पाणी स्रोत असणारा पाझर तलाव भरल्याने नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे तसेच त्यामुळे लोकांची होणारी गैरसोय टळणार आहे, याबाबत सणसवाडी ग्रामपंचायत सर्व कार्यकारिणी तसेच सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, यांनी आमदार पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे पाण्याची मागणी केली होती, तसेच पुरेसा पाऊस नसल्याने पाण्याचा प्रश्न तयार झाला होता, ग्रामस्थांच्या या रास्त मागणीचा विचार करत आमदार पवार यांनी तातडीने येथील पाझर तलावामध्ये पाणी सोडण्यात आले, सर्व ग्रामस्थांनी आमदार पवार यांचे आभार मानले,
यावेळी पुणे जिल्हा परिषद नियोजन समितीचे सदस्य पंडित आप्पा दरेकर, शेतकरी रतन हरगुडे, सुनील हरगुडे, प्राध्यापक अनिल गोटे, व ग्रामस्थ उपस्थित होते,