वढू (बु.) आणि वढू (खु.) या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाच्या कामाची पाहणी शिरूर हवेली मतदारसंघाचे कार्यसम्राट तसेच विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत भीमा नदीवर होणाऱ्या फुलाची पाहणी केली,
श्री क्षेत्र तुळापूर आणि वढू (बु.) या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक होत आहे. सदर पुलाच्या निर्मितीने शंभू प्रेमींना दोन्ही ठिकाणी होणाऱ्या स्मारकाचे दर्शन घेणे सुलभ होण्यासाठी आमदार पवार यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध करण्यात आला असून संबंधित पुलाचे उभारणीचे काम सद्यस्थितीत चालू आहे,
स्वराज्याचे धाकलं धनी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ श्रीक्षेत्र वढु बुद्रुक ( तालुका शिरूर ) तसेच श्रीक्षेत्र तुळापूर ( तालुका हवेली ) या ठिकाणी शंभू भक्तांची, शिवभक्तांची अखंड हिंदुस्तानातून येणे जाणे असते, तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळ आळंदी, जगद्गुरु तुकाराम महाराज समाधी देहू पालखी मार्ग या सर्व बाबींचा विचार करून आमदार पवार यांच्या प्रयत्नातून वढू बुद्रुक / वढु खुर्द तसेच आपटी / तुळापूर या गावांना जोडण्यासाठी भीमा नदीवर दोन पुलांची मागणी केली होती, दोन्हीही पूल मंजूर असून सद्यस्थितीत तातडीने वढू बुद्रुक / वढू खुर्द या पुलाचे काम चालू करण्यात आले, शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात विकास कामांची कायम रेलचेल असते, तसेच आमदार पवार यांचे या कामावर कायम काटेकोर लक्ष असते, त्यांनी स्वतः संबंधित पुलाची पाहणी करत चांगल्या प्रतीचे काम करण्याच्या तसेच लवकरात लवकर काम करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या,