चासकमान धरण पूर्ण क्षमतेने भरले शेतकऱ्यांमध्ये समाधान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले जलपूजन

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी आरिफभाई शेख 
         महाराष्ट्र राज्य मध्ये बऱ्याचश्या ठिकाणी उशिराने पाऊस सुरू झाला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते परंतु जुलैचे शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू झालेल्या पावसामुळे बऱ्याचशा प्रमाणात जलस्रोत प्रवाहित झाले चासकमान धरणे पूर्ण क्षमतेने भरलेल आहे.
    खेड आणि शिरूर तालुक्यातील बरेच शेतकऱ्यांच्या जमिनी चासकमान धरणाच्या पाण्याखाली आहेत. हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा आणि समाधानाचे वातावरण आहे दोन्ही तालुक्यांना मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा या धरणामार्फत होत असतो आज हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे त्यामुळे खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांचे उपस्थितीत त्याचे जलपूजन करण्यात आले त्यांच्यासोबत खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश भाऊ राक्षे अरुण चांबरे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच महिला आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!