कोरेगाव भीमा - वढु बुद्रुक शिवेचा ओढ्यामध्ये सोडले जात आहे रसायन व ऑइल मिश्रित पाणी नागरिकांचे आरोग्य धोक्यात- पर्यावरण खात्याचे दुर्लक्ष, पहा व्हिडिओ

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
               कोरेगाव भीमा - वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील शिवेचा ओढा मध्ये ओढ्या लगत असणाऱ्या कंपन्यांकडून घातक रसायन मिश्रित तसेच ऑइल मिश्रित पाणी दिवसा ढवळ्या ओढ्यामध्ये सोडले जात असून हे पाणी पुढे भीमा नदीमध्ये जात असल्याने नागरिकांचे आरोग्य तसेच जल जीवन धोक्यात आले आहे,        
      कोरेगाव भीमा ते अखंड हिंदुस्तानचे आरोग्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाला जोडणाऱ्या मार्गालगत शिवेचा ओढा हा महत्त्वाचा जलस्रोत आहे पावसाळ्यात या ओढ्याला मोठा पूर असतो गावापासून पूर्व बाजूला असणाऱ्या डोंगर रांगे मधून पाण्याचा मोठा पूर येत असतो, परंतु या ओढ्यालगत असणाऱ्या कंपन्यांकडून घातक रसायन, तसेच ऑइल मिश्रित पाणी दिवसाढवळ्या राजरोसपणे ओढ्यामध्ये सोडले जात आहे, हे रसायन पुढे भीमा नदीत मिश्रित होत असल्याने, नदीचे पाणी दूषित झाले आहे, आसपासची शेकडो एकर जमीन नदीच्या पाण्यावर अवलंबून असून, नदीकाठी असलेल्या गावांना ग्रामपंचायत मार्फत  पाण्याचा पुरवठा केला जातो, एकंदरीत रसायन मिश्रीत पाण्यामुळे सभोवतालची शेती, तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,           
   या रसायन मिश्रित पाण्याचा जल जीवनावर मोठा परिणाम होत असून पाण्यातील मासे तसेच इतर जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, संबंधित कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे ओढ्याचे पाणी दूषित झाले असून, सभोवताली दुर्गंधी पसरली आहे, पर्यटन स्थळाच्या मार्गावर शासकीय सर्व स्तरातील अधिकारी प्रवास करत असताना दिसून आंधळेपणाचे सोंग घेतले जात आहे,
कंपनी प्रतिनिधीशी चर्चा केली असता टोलवाटोलवी चे उत्तर मिळत आहे,  हा प्रकार गेले अनेक वर्षापासून चालला असून पर्यावरण खाते मात्र याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे, संबंधित कंपन्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!